नागपूर,
eye donation हनुमाननगर, नागपूर येथे ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भच्या वतीने रौशनी फाऊंडेशनतर्फे नेत्रदान जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुमारे ३५ ते ४० ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रौशनी फाऊंडेशनचे दाणी, माटे, जैन आणि पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे तेलंग, भुताड आणि वाराणशीवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमादरम्यान ११ ज्येष्ठ नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत फॉर्म भरले.
सौजन्य: सुधीर वारणाशिवार, संपर्क मित्र