कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार गायकवाड समर्थक आमने-सामने

घरासमोर पुस्तकवाचन आंदोलन चिघळले

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
बुलढाणा,
book author prashant ambi शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे लेखक प्रशांत आंबी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आज जिल्ह्यात दिसून आले. कम्युनिस्ट पक्ष व आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आमने- सामने येत चांगलाच वाद निर्माण झाला होता.
 
आमदार गायकवाड समर्थक आमने सामने 
 
 
 
कोल्हापूर येथून पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबी व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते पुस्तक वाचन आ.गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी बुलढाणा शहरात दाखल झाले. दरम्यान  शहरात तसेच चिखली मलकापूर रस्त्यावर पोलीस व दंगाकाबू पथकाचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.  पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबी यांना चिखली पोलिसांनी स्थानबद्ध केले. मात्र बुलढाणा येथे पुस्तक वाचन करण्यासाठी दाखल झालेले कार्यकर्ते व आमदार गायकवाड समर्थक जिजामाता प्रेक्षगार येथे जोरदार घोषणाबाजी करुन चांगलाच वाद घातला. यावेळी पोलिसांनी बलाचा वापर करत आंदोलकांना अटक केली. दुसरीकडे मातोश्री जनसपंर्क कार्यालयासमोर आ. गायकवाड समर्थक हजारो संख्येने 'आ. गायकवाड आगे बढो' चा जयघोष करीत होते. 
 
">