कारंजा लाड,
class-12-students-waiting-for-results : तालुक्यातील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या तब्बल २६८३ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप प्रलंबित असून, निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक आता शिगेला पोहोचली आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत, म्हणजेच १५ मेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शयता व्यक्त होत असली तरी अधिकृत घोषणे अभावी अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.

परीक्षा संपून काही आठवडे उलटले असताना विद्यार्थ्यांनी निकालाच्या प्रतिक्षेत दिवस मोजण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मोबाईलवर निकालाच्या अपडेट्स पाहणे, मित्र व शाळेशी संपर्क ठेवणे, सोशल मीडियावर चर्चांना उधाण येणे अशी परिस्थिती सध्या तालुयात पाहायला मिळत आहे.विशेषतः बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रतीक्षा अधिकच तणावपूर्ण ठरत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी निकाल अत्यंत महत्त्वाचा असल्याने निकाल वेळेत लागणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधेअभावी अचूक माहिती मिळण्यात अडचणी येत असून, अनेक जण शाळा, सायबर कॅफे किंवा ओळखीच्या व्यक्तींवर अवलंबून आहेत.
यामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.दरम्यान, शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य राखण्याचे आवाहन करत असून, निकाल हा आयुष्याचा अंतिम टप्पा नसून पुढील संधींचे दार आहे, असा सकारात्मक संदेश देत आहेत. पालकांनीही मुलांवर अनावश्यक दबाव टाळून त्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या या २६८३ विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या अधांतरी असल्याचे चित्र असून, संपूर्ण कारंजा तालुयाचे लक्ष आता येत्या काही दिवसांत जाहीर होणार्या निकालाकडे लागले आहे. ता.प्र २६८३ विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा...यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा पार पडली. परीक्षा होऊन जवळपास दीड महिना उलटला.यंदा कारंजा तालुयातील २६८३ विद्यार्थ्यांनी कला,वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन विभागात बारावीची परीक्षा दिली. आता विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.