आष्टी (श.),
fire-breaks-out-in-sujatpur-forest : आष्टी ते मोर्शी मार्गावर येनाडा गावाजवळील सुजातपूर जंगलात २७ रोजी भीषण आग लागली. यात वनविभागाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. दुसर्या दिवशीही जंगलात धुराचे लोळ दिसत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी-मोर्शी रस्त्यावरील येनाडा फाट्याजवळ अज्ञात इसमाने जंगलात आग लावली. येनाडा आणि सुजातपूर जंगलाचे मोठे भाग आगीत भस्म झाले. दिवसभर आगीचे लोळ दिसत होते. वनविभागातील काही बिटगार्ड घटनास्थळी धावले आणि कडक उन्हात आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. २७ एप्रिलच्या मध्यरात्रीही आगीचे लोळ रस्त्यावरून जाणार्या वाहनचालकांच्या नजरेस पडत होते.
लहान आर्वी येथील शेतकरी धीरज शेटे यांच्या संत्रा झाडांना आग लागून नुकसान त्यांचेही झाले. ही बाब बिटगार्ड यांना कळवण्यात आली.