conscious customer वीज ही केवळ सुविधा न राहता 21 व्या शतकात अन्न, वस्त्र व निवाऱ्याप्रमाणेच एक मूलभूत गरज बनली आहे. आजचे युग तांत्रिक प्रगतीचे आहे. घरोघरी रेफ्रिजरेटर, ओव्हन, वॉशिंग मशिन, पाणी गरम करण्याच्या गिझरपासून ते अत्याधुनिक उपकरणांपर्यंत... यादी सतत वाढत आहे. साहजिकच उपकरणांची संख्या व त्यांचा वापर वाढला की वीज बिलात वाढ होणारच. विशेषतः उन्हाळ्यात पारा वाढल्यामुळे पंखे, कुलर, एअर कंडिशनर्सचा वापर सातत्याने होतो. एप्रिल ते जूनच्या कडाक्याच्या उन्हात झालेला हा वापर जेव्हा वीज बिलात परावर्तित होतो, तेव्हा अनेक ग्राहकांना ते बिल भरमसाठ वाटते. कधीकधी मानवी चूक किंवा तांत्रिक दोष असू शकतो, परंतु प्रत्येक वेळी हेच कारण नसते.
आपल्याला येणारे वीज बिल योग्य आहे का, हे तपासणे आता अतिशय सोपे झाले आहे. घरातील प्रत्येक उपकरणाचा वॅट व त्याचा दिवसातील वापराचे तास यांची माहिती घेतल्यास आपण स्वतः विजेचे ऑडिट करू शकतो. आपल्या वीज बिलाच्या मागील बाजूला वीज दराची वर्गवारी दिलेली असते. यामध्ये 0 ते 100, 101 ते 300, 301 ते 500 व त्यापुढील वापरासाठी टप्प्याटप्प्याने वाढणारे दर नमूद असतात. तुमचा वापर जसा एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जातो, तसे प्रति युनिट दर वाढतात.conscious customer 300 युनिटच्या पुढे बिल वेगाने वाढते.(वा)