मार्डी व नवरगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक : उद्या निकाल

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
मारेगाव, 
Gram Panchayat by-election मारेगाव पंचायत समिती अंतर्गत मार्डी व नवरगाव या दोन ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक मंगळवार, 28 एप्रिलला पार पडली. मार्डी प्रभाग 3 मध्ये 71 टक्के आणि नवरगाव प्रभाग 1 मध्ये 49.84 व प्रभाग 3 मध्ये 58.87 टक्के मतदान झाले.
 

election  
 
मार्डीत मनीषा प्रशांत नागपुरे व माधुरी अंकुश गुरनुले यांच्यात लढत झाली. तर नवरगाव प्रभाग 1 मध्ये सुरेश डवरे व हर्षल शेंडे यांच्यात आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरेश डवरे व संकेत डवरे यांच्यात लढत आहे. निवडणुकीचा निकाल बुधवार, 29 एप्रिलला असून कोण विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.