‘कही हम भूल ना जाये’ अभियानातून बाबासाहेबांना सलाम

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Salute to Babasaheb भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९३७ रोजी नागपूरच्या हायकोर्टाच्या जुन्या इमारतीत आगमनदास फाशी प्रकरणात त्यांची बाजू मांडत त्यांना दोषमुक्त करून दिले होते. या ऐतिहासिक घटनेला यंदा ८९ वर्षे पूर्ण होत आहेत. आगमनदास हे छत्तीसगड परिसरातील सतनामी पंथाचे प्रसिद्ध गुरु बाबा मुक्तावनदास यांचे बंधू होते. तसेच ते वऱ्हाड मध्य प्रांताच्या कायदे मंडळात १७ फेब्रुवारी १९३७ रोजी निवडून आले होते.
 
nagpur
 
या पार्श्वभूमीवर ‘कही हम भूल ना जाये’ या बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नागपूर हायकोर्टाच्या जुन्या इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात येणार आहे. Salute to Babasaheb दरम्यान, शासनाने हायकोर्टाच्या या जुन्या इमारतीला ऐतिहासिक धरोहर म्हणून संरक्षित केले आहे.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र