आर्णी,
Short circuit in solar power plant तालुक्यातील शिरपूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. ही आग शेजारच्या शेतात पसरल्याने शेतकऱ्याचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात, पीडित शेतकऱ्याने तहसीलदारांकडे दाद मागितली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
शिरपूरचे शेतकरी दीपक गंगाराम राठोड यांच्या शेताला लागूनच एक मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पात अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागली. वाèयाच्या प्रचंड वेगामुळे अल्पावधीतच आग राठोड यांच्या शेतात शिरली. या भीषण आगीत शेतकऱ्याने जोपासलेली 300 ते 400 लहान-मोठी सागाची झाडे पूर्णपणे जळून खाक झाली. तसेच, शेतातील सिंचनासाठी लावलेले स्प्रिंकलर पाईप्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
Short circuit in solar power plant शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, या आगीत त्याचे सुमारे 10 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्याच्या हातात येणारे अन्नही हिरावले गेले आहे. फुलाबाई हरसिंग जाधव यांच्याही शेतातील लाकडांचे नुकसान झाले. या दोन्ही पीडितांनी तत्काळ आर्णी तहसील कार्यालयात धाव घेतली. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे आमचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे सांगून त्यांनी, प्रशासनाने तत्काळ घटनास्थळाची पाहणी करावी आणि सौर कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. आता महसूल विभाग आणि संबंधित कंपनी यात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.