अनिल कांबळे
नागपूर,
student kidnapped शिकवणी वर्गाला जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. लॉजवर घेऊन जात जबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जवळपास वर्षभर तो धमकावून तिचे शोषण करीत होता. यातून पीडितेला गर्भधारणा झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी तरुणाला अटक केली. हर्षल युवराज नारनवरे (रा. हिवरीनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १५ वर्षांची असून नंदनवन परिसरातील एका माध्यमिक शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे. आरोपी हर्षल हा खाजगी वाहनावर चालक आहे. वर्षभरापूर्वी आरोपी हर्षल पीडित मुलीचा पाठलाग करत होता. जबरीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पीडिता त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होती. दरम्यान पीडिता शिकवणी वर्गाला जात असताना आरोपी हर्षलने तिचा पाठलाग केला. जबरीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध केला असता तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडिता घाबरली. त्यानंतर तो तिला वाठोडा परिसरातील एका मित्राच्या लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. तेव्हापासून तो सतत धमकावून तिचे शोषण करीत होता.
काही दिवसांपूर्वी अचानक पीडितेच्या पोटात दुखू लागले. कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले. डॉक्टरांच्या तपासणीत ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.student kidnapped कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडितेने हर्षलच्या कुकृत्याचा पाढा वाचला. त्यानंतर कुटुंबीयांनी पीडितेसह नंदनवन पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.