मुंबई
police constable death शीव–पनवेल महामार्गावरील मानखुर्द परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपूल बांधकामादरम्यान भीषण दुर्घटनेत एका पोलिस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उड्डाणपुलाच्या खोदकामासाठी वापरले जाणारे अवजड यंत्र अचानक कोसळून त्यांच्या अंगावर पडल्याने हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मानखुर्द परिसरातील एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपूल कामाच्या ठिकाणी घडली. पोलिस शिपाई संतोष चौहान हे आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्यालगत उभे असलेले मोठे ड्रिलिंग/पायलिंग यंत्र अचानक तोल जाऊन खाली कोसळले. या यंत्राचा थेट त्यांच्या दुचाकीवर आघात झाल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि कामगारांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमी शिपायाला रुग्णालयात हलवले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
या प्रकरणी बांधकाम कंत्राटदाराच्या police constable death निष्काळजीपणाचा संशय व्यक्त केला जात असून मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, अवजड यंत्र उभे करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या दुर्घटनेमुळे मुंबईतील मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या कामांदरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील वाहतूक आणि बांधकाम क्षेत्रातील समन्वयाचा अभाव तसेच अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.दरम्यान, पोलिस अधिक तपास करत असून यंत्र कोसळण्यामागील नेमके कारण, तांत्रिक बिघाड की निष्काळजीपणा, याचा शोध घेतला जात आहे.