खिशाला पुन्हा कात्री! सीएनजीच्या दरात मोठी वाढ

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
पुणे
CNG price hike पुणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे. पेट्रोल आणि एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर आता पुणेकरांना सीएनजीच्या महागाईचा सामना करावा लागणार आहे. पुणे शहरात सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवीन दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या वाढीमुळे सार्वजनिक वाहतूक तसेच खाजगी वाहनधारकांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.
 

Pune CNG price hike 
सध्या पुणे आणि आसपासच्या भागात सीएनजीसाठी ग्राहकांना आता अधिक मोजावे लागणार आहे. नवीन दरानुसार, प्रति किलो सीएनजीचे दर ९४.५० रुपयांवर पोहोचले आहेत, जे मागील ९२.५० रुपयांपेक्षा २ रुपये जास्त आहेत.
या दरवाढीचे मुख्य कारण CNG price hike आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या तुटवड्याशी संबंधित आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्यामुळे सीएनजी महागल्याचे अनुमान वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे पुण्यात रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूक भाड्यांच्या वाढीची शक्यता देखील वाढली आहे.गेल्या काही दिवसांत घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या किमतीत झालेल्या सततच्या वाढीनंतर, सीएनजीच्या वाढीमुळे मध्यमवर्गीय घरांचे मासिक बजेट आणखी ताणले जाऊ लागले आहे. आधी ९२.५० रुपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आता ९४.५० रुपयांवर खरेदी करावा लागणार आहे.याच दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने आपल्या प्रीमियम श्रेणीतील इंधनांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. कंपनीने बुधवारी मध्यरात्रीपासून 'XP100' (१००-ऑक्टेन) पेट्रोलचे दर १६० रुपयांवर नेले आहेत, जे दिल्लीतील १४९ रुपयांच्या दरापेक्षा ११ रुपयांनी जास्त आहेत. तसेच प्रीमियम श्रेणीतील 'एक्स्ट्रा ग्रीन' डिझेलचे दर ९१.४९ रुपयांवरून ९२.९९ रुपये करण्यात आले आहेत. ही दरवाढ आयओसीएलच्या सर्व अधिकृत विक्री केंद्रांवर लागू झाली असून, हाय-एंड वाहनधारकांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.