नागपूर,
Science and Mathematics Lecture पीएम श्री योजनेअंतर्गत “राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन” या उपक्रमांतर्गत पीएम श्री लाल बहादुर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेमध्ये विज्ञान व्याख्यान व प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी यंग सायन्स कम्युनिकेटर कालिदास नाकाडे यांना तज्ज्ञ म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी “जीवन आणि विज्ञान” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, विविध रोचक विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिकाद्वारे सादर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूला उपलब्ध साधनांमधून विज्ञान समजून घेता येते, हे शिकवले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात गणितज्ञ यशवंत फटाले उपस्थित होते. त्यांनी “आपल्या जीवनातील गणिताचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी मार्गांनी गणित समजून घेण्याचे तंत्र शिकवले. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षक व विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. Science and Mathematics Lecture यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सिंघानिया, विज्ञान व गणित शिक्षिका, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सौजन्य: माधुरी पाडळकर, संपर्क मित्र