चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी वसुमना पंत रुजू

शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे व्यवहारे, दगडू कुंभार, विशाल मेश्राम, शुभम दांडेकर

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर,
Vasumana Pant joins as Chandrapur District Collector भारतीय प्रशासकीय सेवेतील वसुमना पंत यांनी शुक्रवार, 3 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर यांनी नूतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
 
pant
सन 2017 मध्ये नागरी सेवेत प्रवेश केल्यानंतर पंत यांनी नंदुरबार येथे उपविभागीय दंडाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यास सुरूवात केली. या कालावधीत त्यांनी आदिवासी समाजाचे कल्याण व सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यानंतर त्यांनी वाशीम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामीण विकास प्रकल्प व विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय फलोत्पादन संचालक तसेच वनामती संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. चंद्रपुरात येण्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून त्या कार्यरत होत्या. तसेच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.