वर्धेत प्रथमच वायुसेनेची प्रदर्शनीला २ हजार युवकांची भेट

*वर्धा युथ फेस्टिवलचा उपक्रम

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
वर्धा,
air force exhibition in wardha वर्धा जिल्ह्यात भारतीय वायुसेना व वर्धा युथ फेस्टिवल यांच्या संयुक्त वतीने ‘चला जाणू या भारतीय वायुसेना’ या उपक्रमांतर्गत करिअर मार्गदर्शन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीला जिल्ह्यातील २ हजार विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.
 

air force exhibition in wardha 
 
 
राष्ट्रपती भवनातून प्रारंभ होणारी भारतीय वायुसेनेची अत्याधुनिक व्हॅन प्रथमच वर्धेत दाखल झाली. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय वायुसेनेच्या तांत्रिक, प्रशासकीय व वैमानिक क्षेत्रातील करिअर संधींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या उपक्रमामध्ये भारतीय वायुसेनेच्या वतीने विंग कमांडर दक्षिणा दशमाना व फ्लाईट लेफ्टनंट गुरुजीत सिंग भुल्लर यांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, इंद्रप्रस्थ वाणिज्य महाविद्यालय व जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान भारतीय वायुसेनेतील अनुभवी व सन्मानित अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना वायुसेनेतील भरती प्रक्रिया, आवश्यक पात्रता, प्रशिक्षण व करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
 
वर्धा युथ फेस्टिवलचे अध्यक्ष सारंग रघाटाटे यांनी वर्धेतील युवकांना त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्यासाठी अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातील.भविष्यात अशाच उपक्रमांची मालिका राबविण्याचा संकल्प रघाटाटे यांनी व्यत केला.
या उपक्रमाकरिता संगम इस्पातचे कार्यकारी अधिकारी दीपक सुमन, शिक्षा मंडळाचे कार्याध्यक्ष संजय भार्गव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.air force exhibition in wardha दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. क्षीतिज राज, बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संतोष कुमार, बजाज विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. वनकर, इंद्रप्रस्थ महाविद्यालयाचे प्रा. संदीप पराते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय वायुसेनेतील अधिकार्‍यांकडून थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचा मार्ग सापडला.