बच्चू कडू यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
मुंबई
Bachchu Kadu विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला असून, या प्रवेशासोबतच त्यांना विधान परिषदेची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
 
Bachchu Kadu,
पक्षप्रवेश सोहळ्यानंतर Bachchu Kadu, माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाबाबत ठाम भूमिका मांडली. “आज हे उचललेलं शिवधनुष्य मी पेलल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या सोबत माझा राजकीय प्रवास नव्याने सुरू झाला आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, त्यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती आणि आता पुन्हा एकदा त्याच प्रवाहात परत येत पुढील वाटचाल शिंदे गटासोबत करणार आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना कडू यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. “शिंदे साहेबांच्या बंगल्याची दारे रात्री २ वाजताही सामान्यांसाठी उघडी असतात. दिव्यांग मंत्रालय आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या निर्णयांत त्यांचा मोठा सहभाग आहे,” असे ते म्हणाले. शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण कोणत्याही पदासाठी Bachchu Kadu या पक्षप्रवेशात आलो नसल्याचे सांगत बच्चू कडू यांनी आपल्या सामाजिक भूमिकेवर भर दिला. दिव्यांगांचे सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, हमीभाव तसेच विधवा भगिनींच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “आमचे मुद्दे मान्य झाल्यानंतरच मी हा पक्षप्रवेश केला,” असेही त्यांनी नमूद केले.राज्यातील प्रत्येक भागात शिवसैनिक उभे करून शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “झेंडा बदलला असला, तरी अजेंडा तोच आहे,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी आपल्या भूमिकेत सातत्य राहणार असल्याचे सांगितले. कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय आतापर्यंत काम करत आलो असून आता शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्याने अधिक ताकदीने काम करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षप्रवेशानंतर बच्चू कडू यांनी सर्व कार्यकर्ते आणि माध्यमांचे आभार मानले.