स्वप्न पूर्ण करा! 'या' जागेसाठी निघाली भरती

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Indian Air Force भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) यंदाच्या २०२६ वर्षासाठी ग्रुप ‘क’ मधील नागरी पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, या भरतीमुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रक्रियेद्वारे लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट आणि नागरी यांत्रिक वाहतूक चालक अशा विविध पदांसाठी एकूण ४७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने राबवली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित हवाई दल स्टेशन किंवा युनिटकडे टपालाद्वारे पाठवणे आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार, अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत, म्हणजेच सुमारे १ जून २०२६ पर्यंत पोहोचणे बंधनकारक आहे.
 

Indian Air Force  
या भरतीत लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी ३७ पदे, हिंदी टायपिस्टसाठी १० पदे आणि नागरी यांत्रिक वाहतूक चालक (OG) साठी ३ पदे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक व कौशल्य निकष निश्चित करण्यात आले आहेत.
लोअर डिव्हिजन क्लर्क आणि हिंदी टायपिस्ट पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी टायपिंगमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंगमध्ये ३० शब्द प्रति मिनिट गती आवश्यक आहे. चालक पदासाठी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, हलकी व अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना तसेच किमान दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य करण्यात आला आहे.
निवड प्रक्रियेत Indian Air Force  उमेदवारांची प्राथमिक निवड लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित पदानुसार टायपिंग टेस्ट किंवा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल-२ मध्ये ₹१९,९०० ते ₹६३,२०० इतके वेतन तसेच इतर शासकीय भत्ते मिळणार आहेत.अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन असल्याने उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून तो स्पष्ट वाचनीय अक्षरात भरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती, जातीचा दाखला आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे बंधनकारक आहे. भरलेला अर्ज संबंधित कमांडिंग ऑफिसरला पोस्टाद्वारे पाठवताना लिफाफ्यावर अर्ज केलेल्या पदाचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.या भरतीमुळे संरक्षण क्षेत्रातील नागरी सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली असून, मोठ्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.