नागपूर,
Tukdoji Maharaj Jayanti छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी प्रभारी प्राचार्य पंकज झगडे, प्रा. दीपक ठाकरे व प्रा. हर्षल रोठे उपस्थित होते. प्रा. दीपक ठाकरे यांनी तुकडोजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला,Tukdoji Maharaj Jayanti तर “खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास” असे मत प्राचार्य पंकज झगडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पायल पशीने यांनी केले तर आभार प्रा. सुषमा वडस्कर यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सौजन्य:सायली लाखे ,पीदळी ,संपर्क मित्र