भीषण अपघात..२ ठार १५ जखमी

    दिनांक :04-Apr-2026
Total Views |
धुळे
Dhule accident news धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी क्रुझर पलटी झाली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

Dhule accident news 
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर तामसवाडी गावाजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. महिर गावाजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन क्रुझर गाडी जात होती. तामसवाडी गावाजवळ पोहोचली असता अचानक क्रुझर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गावर क्रुझरने दोन तीन पलट्या मारल्या. क्रुझरमधील २ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
अपघातानंतर Dhule accident news स्थानिकांनी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले, जखमींना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. लग्न कार्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाल्यामुळे आनंदाच्या क्षणी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.