मुंबई,
Karisma Kapoor बॉलिवूडमधील सुपरहिट अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी आपल्या यशामागील खरे कारण सांगताना आईबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. कपूर कुटुंबातून येऊनही करिश्माचा चित्रपटसृष्टीतील प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात तिला अनेक अडचणी, टीका आणि संघर्षांना सामोरे जावे लागले.
त्या म्हणाल्या या कठीण काळात त्यांचा आई बबिता कपूर त्याच्यासाठी सर्वात मोठा आधार होत्या. माझ्या मेहनतीसोबतच आईच्या पाठिंब्यामुळेच ती आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री बनू शकली आहे. माझी आई माझ्यासाठी देवासारखी आहे. आज मी जे काही आहे, ते तिच्यामुळेच आहे. कुटुंबातील सगळ्यांनी मला साथ दिली, पण आईने दिलेला आत्मविश्वास आणि संस्कार हेच माझ्या आयुष्याची खरी ताकद आहेत.अलीकडेच करिश्मा कपूर इंडियन आइडल या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणून दिसल्या
करिश्माच्या या वक्तव्यामुळे Karisma Kapoor तिच्या आई-मुलीच्या नात्याची जिव्हाळ्याची झलक पाहायला मिळाली असून, चाहत्यांकडूनही तिच्या या भावनिक बोलण्याचे कौतुक होत आहे.