भीषण आगीत चार घरे भस्मसात

    दिनांक :04-Apr-2026
Total Views |
खारी गावातील घटना
 
धारणी, 
Terrible fire in Khari village धारणी तालुक्यातील खारी गावात ३ एप्रिलच्या रात्री ११ च्या सुमारास आग लागून चार घरे भस्मसात झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात शेत व घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी प्राथमिक मदत करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठविला आहे.
 
 
aag dsk
 
Terrible fire in Khari village खारी गावात अज्ञात कारणामुळे शुक्रवारी रात्री सुरेश जीवन घुले, युवराज प्रकाश धुर्वे, माया किशोर ताईत व शैलेश सुरेश घुले यांची घरे भस्मसात झाली व चारही कुटुंबातील २० जण उघड्यावर आले आहेत. धारणी नगर पंचायतचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले. घरातील गव्हासह सर्वच आवश्यक साहित्य जळून खाक झाले आहे. तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनात महिला तलाठी उईके यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आगीचे नेमके कारण समजले नसले तरी खेड्यापाड्यातील कुडाच्या घरात राहणार्‍यांनी सावधगिरीने राहण्याची गरज आहे. यावर्षी उन्हाळा लागताच जंगलात कमी मात्र शेत व गावांमध्ये जास्त आगी लागत आहेत.