सीमापार रॅकेट सक्रिय : जबाबदार कोण ?
पांढरकवडा,
पांढरकवडा परिसरात Cattle smuggling गोवंश तस्करीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, सीमापार रॅकेट, स्थानिक मदतनीस टोळ्या आणि अपुरी पोलिस कारवाई यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली एकीकडे पोलिस कारवाईचे आकडे पुढे येत असताना, दुसरीकडे मात्र दररोज मोठ्या प्रमाणात सुरू असलेली अवैध वाहतूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पांढरकवडा पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत गोवंश तस्करीविरोधात कारवाई करत ४० आरोपींना अटक करून १४० गोवंशांना जीवदान देऊन सुमारे ४०,५५,६९० किमतीचे गोवंश जप्त तसेच १,४५,०५,००५ किंमतीची वाहने जप्त करण्यात आली.
ही कारवाई महत्त्वाची असली, तरी प्रत्यक्षात सुरू असलेल्या Cattle smuggling तस्करीच्या तुलनेत ती अपुरी असल्याचे गोप्रेमींचे म्हणणे आहे. दररोज अनेक गाड्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून तेलंगणात जात आहेत. स्थानिकांच्या मते, या मार्गावरून दररोज २० ते ३० वाहने गोवंश घेऊन जातात. त्यामुळे तीन महिन्यांत हजारो तस्करी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कारवाई केवळ काही प्रकरणांपुरती मर्यादित राहिल्याने ही कारवाई पुरेशी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागपूर, कामठीसह मध्यप्रदेशातून थेट पांढरकवड्यापर्यंत वाहने येतात कशा हाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इतका मोठा प्रवास करत असताना तस्करांची ही वाहने नाक्यांवर अडवली जात का, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या गोवंश तस्करांना स्थानिक टोळ्यांचे पाठबळ सातत्याने मिळत असून पांढरकवडा व पाटणबोरी परिसरात तस्करांना मदत करणार्या स्थानिक टोळ्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. या टोळ्या पोलिस हालचालींची माहिती देणे, पर्यायी मार्ग दाखवणे, वाहनांना सुरक्षित मार्गाने पुढे पाठवणे, अशा प्रकारे तस्करी सुलभ करत सांगितले जात आहे.
जनावरांवर अमानुष अत्याचार
तस्करीदरम्यान जनावरांना गाड्यांमध्ये कोंबून नेणे, पाणी, चारा, विश्रांती न देणे, प्रवासात मृत्यू होणे अशा प्रकारचे अमानुष प्रकार आणि अत्याचार सहन करावे लागत आहेत. गोवंश तस्करीविरोधात काही प्रमाणात कारवाई होत असली, तरी दररोज सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील तस्करीसमोर ती अपुरी आहे. त्यामुळे आता एकच उपस्थित होत आहे, Cattle smuggling गोवंश तस्करीला कायमस्वरूपी आळा कधी बसणार..?