नागरिकांची गर्दी; निवेदनांवर कार्यवाहीचे निर्देश

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
नितीन गडकरी यांचा जनसंपर्क
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
नावीन्यपूर्ण कल्पनांचेही कौतुक
नागपूर, 
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक‘माला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. महिला, पुरुष, दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्या मांडल्या. सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले. तरुणांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण कल्पनांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. खामलामधील जनसंपर्क कार्यालयात रविवारी सकाळपासून मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे घेतले. व्यक्तिगत पातळीवरील संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी चर्चा केली.
 
 
gadakri da
 
विविध क्षेत्रातील विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांनी कृत्रिम अवयवांच्या उपलब्धतेसाठी, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार यासारख्या सरकारी योजनांमधून मदत मिळण्यासंदर्भात निवेदने दिली. Nitin Gadkari  गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे निर्देश तात्काळ संबंधित अधिकार्‍यांना दिले. विविध संस्थांचे प्रतिनिधी आपल्या अडचणी घेऊन यावेळी आले होते. काहींनी निधी, जागा किंवा परवानग्यांसंबंधी समस्या मांडल्या. सामाजिक व धार्मिक संस्थांनी त्यांच्या समुदायातील प्रश्न तसेच उपक‘मांसाठी मदतीची विनंती करणारी निवेदने दिली. गडकरी यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले व संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय, नासुप्र, आरोग्य विभागांमधील जनसंपर्क कार्यक‘मात उपस्थित होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणे अधिक सोयीचे ठरले.
नावीन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण
इलेक्ट्रिक व्हेईकल्स, त्यामध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरीज, राष्ट्रीय महामार्गांवरील मूलभूत सोयी-सुविधा आदींच्या संदर्भात तरुणांनी सादरीकरण केले. Nitin Gadkari  नितीन गडकरींनी या कल्पनांचे कौतुक करून संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.