चित्रकार रणजितदत्त वर्मा यांचा माहूर येथे सन्मान

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
श्रीक्षेत्र माहूर, 
येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे Painter Ranjit Dutt Verma honored चित्रकार तथा माहूरभूषण रणजीतदत्त वर्मा यांचे ‘ग्वाला’ हे एकल चित्रप्रदर्शन मुंबईत जगप्रसिद्ध कलादालन येथे १६ ते २२ मार्च दरम्यान पार पडले. त्यानिमित्ताने रणजीत वर्मा यांचा सहृदयी सत्कार समारंभ येथील आनंद दत्तधाम आश्रमात गुरुवार, २ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला. हा सन्मान श्री आनंद दत्तधाम आश्रमाकडून मठाधीपती राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद शाखा माहूर संयुक्तरित्या करण्यात आला. यावेळी चित्रकार रणजितदत्त वर्मा व त्यांच्या अर्धांगिनी जयश्री सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला.
 
 
Ranjit Dutt
 
याप्रसंगी आनंद दत्तधामचे मठाधीपती साईनाथ महाराज वसमतकर यांनी उपस्थित मान्यवर व भक्तगण यांना रणजीत वर्मा यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे कष्ट व चिकाटी हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे आणि कष्टाविना कुणीच पावत परिश्रम हीच खरी ईश्वरसेवा आहे आणि प्रत्येकाने वर्मा यांचे हे गुण हेरून आपल्या मुलांना केवळ शिक्षण नाही तर विविध कलांमध्ये निपुण करण्यास आपण प्रयत्नशील असावे, असा मोलाचा संदेश दिला. मनोगतातून रणजीत वर्मा यांनी त्यांचा आजवरचा प्रवास सांगत, ‘ग्वाला’ या विषयाला घेऊन जहांगीर आर्ट गॅलरीचा कसा प्रवास होता हे विशद त्यांनी आपल्या यशामध्ये आपली पत्नी, भाऊ, भावजय यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. वडीलांकडून वारसाने मिळालेल्या या कलेला त्यांनी सातत्य आणि चिकाटीने पुढे कसे नेले हा अनुभव कथन केला. तसेच माहूर व माहूरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 
 
Painter Ranjit Dutt Verma honored  कार्यक‘माचे आयोजक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा माहूरचे तालुकाध्यक्ष पाटील यांनी सुरेख सूत्रसंचालन आपल्या सहकारी मित्राने घेतलेल्या कष्टांचे मोल नाही आणि रणजीत वर्मा म्हणजे माहूरगडची आज ओळख बनली आहे, असे गौरवोद्गार काढले. यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने वसंत कपाटे, विजय आमले, नंदकुमार जोशी, इलियास बावानी, संजय घोगरे, अमजदखान हैदर पठाण यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. जवाहरलाल जयस्वाल, भाऊराव हडसणीकर, पुंडलिक हुंबे, गजानन गोडसे, उदय कवी मिलिंद कंधारे, प्रा. विनोद कांबळे, प्रवीण वाघमारे, जितेंद्र वर्मा, रांगोळीकार सुरेश आराध्ये व अनेक भक्तगण उपस्थित होते.