वणी,
Sanskrit Conversation Camp संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीबद्दल सर्वसामान्यामध्ये आपुलकी निर्माण व्हावी. संस्कृत ही जनसामान्यांची भाषा बनावी. या उद्देशाने कार्यरत असलेल्या संस्कृत भारतीच्या वतीने वणी येथील छोरीया टाऊनशिपमधील हनुमान मंदिरात निःशुल्क संस्कृत संभाषण शिबिर होत आहे.
हे ६ ते १३ एप्रिल दरम्यान रोज संध्याकाळी ६.३० ते ८ या वेळात होणार आहे. या शिबिरात १० वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला सहभागी होता येणार असून, संस्कृत भाषेचे कोणतेही पूर्वज्ञान आवश्यक नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी व्यक्तींना अल्पावधीतच सहजपणे संस्कृत भाषेत संवाद साधता येईल, असा प्रयत्न या करण्यात येणार आहे. या वर्गांचे मार्गदर्शन संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रणिता भाकरे करणार असून त्या हसत-खेळत पद्धतीने संस्कृत संभाषण शिकवणार आहेत.
Sanskrit Conversation Camp या उपक‘मात सहभागी होण्यासाठी संस्कृत भाषा शाखा वणीचे अध्यक्ष डॉ. स्वानंद पुंड (९८२२६४४६११), नगरमंत्री महेश पुंड (८३१७२०७०१९) तसेच वर्ग संयोजक प्रणिता प्रशांत भाकरे (९८२३२४२९४९) यांच्याशी संपर्क साधावा थेट शिबिरस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृत भारतीने केले आहे.