उशिरा का होईना, कापूस १० हजार १० रुपये!

    दिनांक :11-May-2026
Total Views |
देवळी,
cotton cost येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात कापसाला तब्बल १० हजार १० ते ९ हजार ५०० रुपये प्रति विंटल असा दर मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या प्रतीच्या कापसाला ६६०० ते ७५०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. त्यावेळी जवळपास ८० टके शेतकर्‍यांनी पैशांसाठी कापूस विकला. मात्र, आता उर्वरित कापसाला १० हजारापर्यंत भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळत आहे.
 
 
cotton cost
 
यंदा अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा, वाढते खत व बियाण्यांचे दर, किटकनाशकांचा खर्च तसेच वाढती मजुरी यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. त्यातच अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीत कापसाच्या दराने १० हजारांचा टप्पा गाठल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळणे गरजेचे आहे. कापसाला मिळालेला हा दर शेतकर्‍यांसाठी थोडाफार दिलासादायक ठरत आहे, अशी भावना अनेक शेतकर्‍यांनी व्यत केली.
 
१० हजार रुपयापर्यंत भाव गेले असले तरीही खूप कमी शेतकर्‍यांना या वाढलेल्या दराचा लाभ मिळाला तर जास्तीत जास्त फायदा हा व्यापार्‍यांना झाला, असे मत शेतकर्‍यांनी व्यत केले. देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्याच्या अखेरीस पर्यंत अंदाजे ४ लाख विंटल कापसाची आवक झाली, हे मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास सारखी असल्याचे समजते. तर धान्य बाजारात यावर्षी आतापर्यंत सोयाबीनची सरासरी आवक १८ हजार विंटलची झाली असून दर कमी झाल्यामुळे सोयाबीनची आवक मंदावली आहे. देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ६२०० ते ५७०० पर्यंत भाव मिळत आहे. समितीमध्ये आतापर्यंत ५ हजार २२३ विंटल चण्याची आवक झाली. परंतु, चण्याला पाहिजे तसे दर मिळाले नाही.cotton cost सध्याच्या स्थितीत चण्याला ४८०० ते ५१०० पर्यंत दर मिळत आहे. तसेच तुरीची आजपर्यंतची आवक ३ हजार ५०० विंटल झाली असून तुरीला ६५०० ते ७७०० पर्यंत दर मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुरीला कमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे सूर आहे. यावेळी गव्हाचे पीकही देवळी परिसरात चांगल्या प्रमाणात झाले. आजपर्यंत मार्केट यार्ड मध्ये गव्हाची आवक ५ हजार २०० विंटल झाली असून गव्हाला २३०० ते २४०० रुपये प्रतिविंटल पर्यंत दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये काही कापूस व्यापार्‍यांची व धान्य व्यापार्‍यांशी चर्चा झाल्यावर त्यांनी सांगितले की, मे महिन्यामध्ये कापसाचे व धान्याचे भाव घटणार नाही तर दरांमध्ये तेजी पाहायला मिळेल. शेतकर्‍यांनी मे महिन्यामध्ये वाढलेल्या भावांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.