वर्धेतील स्वा. सावरकर स्मारक बोधपूर्ण आणि प्रेरणादायी : उषा चाटी

    दिनांक :12-May-2026
Total Views |
वर्धा,
swa savarkar memorial स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी जाणीवपूर्वक करणार्‍या अनेक संस्था केवळ राजकीय लाभासाठी पुढे येताना दिसत आहे. जाती वर्णाच्या चौकटीबाहेर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हृदयाशी ठेवून बालपणापासून हिंदुत्त्वासाठी कार्य करणार्‍या सावरकरांना माफी वीर, ब्रिटिशांचे हस्तक, आदी त्यांच्या राष्ट्रभक्तीपर कार्याचे आणि सामाजिक कार्याचे हनन करणार्‍या सर्व संस्थांनी वर्धेतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक जरूर बघावे, अशी प्रतिक्रिया नागपूर येथील आरोग्य मंदिर न्यासाच्या पदाधिकारी उषा चाटी यांनी व्यक्त केली.
 

swa savarkar memorial 
 
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या स्मृती दिनानिमित्त तसेच रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सावरकरांची मुक्तता स्मृती दिनानिमित्त त्यांनी १० मे रोजी सावरकर स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी ९५ वर्षीय उषा चाटी आल्या असता त्यांनी आपली भावना व्यक्त केली. त्यांच्यासोबत मंचावर नागपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या सदस्य भारती दामले, निशिगंधा प्रकाशन संस्थेच्या संध्या लाखे उपस्थित होत्या.
उषा चाटी पुढे म्हणाल्या, वर्धा येथील स्वा. सावरकर स्मारक बघून खूप आनंद झाला. आपण सावरकरांना अनेकवेळा बघितले आणि अनुभवले आहे. येथे स्मारकात सावरकर चरित्राशी निगडित जो इतिहास प्रसंग चित्रासहित लिखित स्वरूपात लिहिला आहे, तो लक्षणीय आहे. सर्व राष्ट्र भतांनी स्मारकाचे आवर्जून दर्शन घ्यावे. हे स्मारक या आणि पुढील पिढीलाही राष्ट्रभती आणि सामाजिक एकोप्याकरिता प्रेरणादायी आहे.swa savarkar memorial कदाचित सावरकरांचे असे स्मारक भारतात तरी असेल असे मला वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या. यावेळी सावरकर समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी नागपूर येथील साहित्य भारतीचे प्रांत पदाधिकारी तसेच सुप्रसिद्ध लाखे प्रकाशनचे संस्थापक चंद्रकांत लाखे तसेच सावरकर स्मारक नागपूरचे कार्याध्यक्ष शिरीष दामले, निखिल दामले, प्रमोद रंगारी उपस्थित होते