तिरोडात बीएसएफ जवानाने केला गोळीबार : एक जखमी

पोलिसांत गुन्हा दाखल, जवान अटकेत

    दिनांक :13-May-2026
Total Views |
गोंदिया,
bsf jawan गाडीला कट मारल्याच्या वादातून एका बीएसएफ जवानाने हवेत गोळीबार केल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना तिरोडा येथील शहरातील मुख्यमार्गावर १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. भूषण दिसले असे त्या आरोपी बीएसएफ जवानाचे नाव आहे. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी असून सध्या तो पंजाब येथे एका बटालियन मध्ये कार्यरत आहे.
 

bsf jawan 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भूषण हा सुट्टीवर गोंदिया येथे नातेवाईकाकडे आला होता. दरम्यान महामार्गावरून जात असताना भुषण व जखमी स्वानंद पारधी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यावेळी रागाच्या भरात भुषन याने आपल्या जवळील बंदूक काढत दहशत निर्माण केली. तर हवेत गोळीबारही केला. यावेळी ती गोळी एका स्वानंद लागली घटनेनंतर स्थानिकांनी जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून बीएसएफ जवानावर तिरोडा पोलिसात गुन्हा नोंद करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.bsf jawan या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रसार माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला असून जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.