Healths Natural Coolant उन्हाळ्यासह सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होणारी काकडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासोबतच शरीराला थंडावा देण्याचे काम काकडी करते. काकडीमध्ये असलेले पोषक घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, तर तिच्या बियाही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
तज्ज्ञांच्या मते, अपचन, मळमळ, उलटी किंवा पोट फुगल्यासारखे वाटत असल्यास काकडी खाणे फायदेशीर ठरते. काकडीमुळे पोटाला थंडावा मिळतो आणि पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते. भूक मंदावल्यास काकडीच्या कापांवर पुदिना, काळे मीठ, लिंबाचा रस, मिरे आणि जिरेपूड टाकून खाल्ल्यास भूक वाढण्यास मदत होते. Healths Natural Coolant त्वचेच्या निगेसाठीही काकडी उपयुक्त मानली जाते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने आराम मिळतो. चेहऱ्यावरील डाग किंवा काळवटपणा कमी करण्यासाठी काकडीचा रस, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला जातो. तसेच चेहऱ्यावर नियमितपणे काकडीचा कीस लावल्यास मुरुम, पुटकुळ्या आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
काकडीचा रस भाजलेल्या किंवा चटका बसलेल्या जागेवर लावल्यास थंडावा मिळतो. रोज काकडी खाल्ल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. आम्लपित्त, गॅसेस किंवा आतड्यांच्या समस्यांमध्ये काकडीचा रस किंवा कीस काही वेळाने घेतल्यास आराम मिळू शकतो. Healths Natural Coolant केसांच्या आरोग्यासाठीही काकडी उपयुक्त मानली जाते. काकडीच्या रसात असलेल्या काही पोषक घटकांमुळे केस गळती कमी होण्यास मदत मिळते. तथापि, तज्ज्ञांच्या मते हिवाळा आणि पावसाळ्यात काकडी मर्यादित प्रमाणात खावी. तसेच सर्दी, खोकला किंवा कफाचा त्रास असल्यास काकडी टाळण्याचा सल्ला दिला जातो.