अनिल कांबळे
नागपूर,
nagpur massacre शहरात हत्याकांडाच्या मालिका थांबण्याचे नाव घेत नसून आजही एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत हत्याकांडाची घटना उघडकीस आली. माधवनगरी परिसरात पहाटेच्या सुमारास आकाश नावाच्या युवकाचा त्याच्या तीन मित्रांनी दगडांनी ठेचून खून केला. रक्ताच्या थाराेळ्यात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्याकांडानंतर आराेपींनी अमरावतीच्या दिशेने पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास माधवनगरी परिसरातील काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक तरुण रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला दिसला. सुरुवातीला ताे जखमी अवस्थेत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, जवळ जाऊन पाहिले असता संबंधित तरुण मृतावस्थेत हाेता. यानंतर नागरिकांनी तातडीने एमआयडीसी पाेलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पाेलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला. प्राथमिक तपासात तरुणाच्या हातावर आकाश नाव गाेंदलेले आहे. मृताच्या शरीरावर गंभीर मारहाणीचे तसेच धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे वार आहेत. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. अद्यापपर्यंत मृत तरुणाची ओळख पटू शकली नव्हती. घटनास्थळाच्या आसपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेèयांचे ुटेजही बारकाईने तपासले जात आहेत. सीसीटीव्हीमध्ये चार तरुण एका माेकळ्या मैदानाकडे जाताना दिसत आहे.nagpur massacre काही वेळानंतर मात्र केवळ तिनच युवक परत येताना दिसत आहेत. त्यामुळे त्या तीन युवकांनीच आकाशचा खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पाेलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून आराेपीला अटक करण्यासाठी एक पथक अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहेत.