ज्येष्ठ नागरिकांसाठी योग शिबिर

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नागपूर,
Patanjali Yoga Committee ज्येष्ठ नागरिक मंडळ दत्तात्रेय नगर, रघुजी नगर व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय विशेष योग शिबिराचा समारोप उत्साहात झाला. शिबिराचे उद्घाटन स्वामी रामदेवजी महाराजांचे शिष्य स्वामी रित देव महाराज यांच्या हस्ते पं. दीनदयाळ उपाध्याय बगीचा, रघुजी नगर येथे करण्यात आले.

 
 
nok
 
 
 
या कार्यक्रमास महाराष्ट्र पूर्वचे प्रचार-प्रसार प्रभारी तथा आंतरराष्ट्रीय योग शिक्षक डॉ. जीवेश पंचभाई, भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी डॉ. अविनाश कोकाटे तसेच प्रकल्प संचालक व ज्येष्ठ योग शिक्षक नामदेव फटिंग प्रमुख उपस्थित होते.शिबिरात डॉ. जीवेश Patanjali Yoga Committee पंचभाई, उर्मिला जुवारकर, राजेंद्र जुवारकर, डॉ. संजय खोंडे आणि हंसराज मिश्रा यांनी योग, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त दिनचर्या, आहार-विहार व सकारात्मक जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.समारोप प्रसंगी श्रीराम दुरगकर, पद्माकर आगरकर, वंदना तांदुलकर, मनोहर धाबेकर व कल्पना गाडगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ सदस्या सुनीता पिंपलकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन नामदेव फटिंग यांनी केले तर भास्कर राघोर्ते यांनी आभार प्रदर्शन केले. शिबिराची सांगता फलाहाराने करण्यात आली.
सौजन्य :अशोक माटे संपर्क मित्र