इराणच्या युरेनियम साठ्यांवर करणार हल्ले

ट्रम्प यांचा इशारा, शांतता करारासाठी वाढवला दबाव

    दिनांक :17-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन
America-Iran war अमेरिका इराणवर 28 फेब्रुवारीपेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यावेळेस त्यांचे युरेनियम साठे जमिनीत गाडले जाईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. शांतता करारास उशिर केल्यास इराणला संघर्षाला सामोरे जावे लागेल, सैन्य माझ्या आदेशाची वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  
trump
 
America-Iran war अमेरिकेच्या हवाई दलाची 11 सी-17 ए विमाने मध्य आशियातून युरोपच्या दिशेने रवाना झाली आहेत. इराणवर हल्ला झाल्यास त्यांच्याकडे काहीही उरणार नाही, विध्वंस रोखायचा असल्यास त्यांनी शांतता कराराच्या अटी मान्य कराव्या असे ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले, पेंटागॉनकडे अनेक योजना तयार आहेत, ज्यामध्ये गरज पडल्यास युद्ध सुरू करण्याचाही समावेश आहे.
 
America-Iran war  याशिवाय, परिस्थितीनुसार सैन्याची संख्या कमी करणे किंवा त्यांना परत बोलवण्याचा पर्यायही खुला आहे. इराणवर पुन्हा हल्ला झाल्यास त्यांची लष्करी तळ आणि पायाभूत सुविधा आणि ऊर्जा प्रकल्प लक्ष्य केले जाईल. इराणसोबतचा संघर्षविराम अत्यंत नाजूक टप्प्यावर असून कधीही पुन्हा हल्ला करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.