ढाका
india-bangladesh बांगलादेशने वरिष्ठ नागरी सेवा अधिकाèयांच्या प्रशिक्षणासाठी भारतातील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीऐवजी पाकिस्तानमधील लाहोरची निवड केली आहे. भारत-बांगलादेश संबंधांमधील तणाव आणि पाकिस्तानसोबत वाढत्या जवळीकतेने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
india-bangladesh बांगलादेशचे बारा वरिष्ठ अधिकारी सध्या ४ ते २१ मे दरम्यान लाहोर येथील नागरी सेवा अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. अधिकाèयांच्या मते, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच संघटित प्रशिक्षण कार्यक्रम आहे. प्रशिक्षणार्थींमध्ये एक अतिरिक्त सचिव आणि ११ सहसचिव स्तरावरील अधिकाèयांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च पाकिस्तान सरकार उचलत असून, बांगलादेश सरकारचा यात कोणताही आर्थिक सहभाग नाही.