शिक्षिकेची 8 लाखाने फसवणूक

    दिनांक :17-May-2026
Total Views |
- शाळेत नाेकरीचे आमिष दाखवून लुबाडले
 
अनिल कांबळे
नागपूर. 
Financial Fraud मतिमंद मुला-मुलींच्या शाळेत कायमस्वरूपी शासकीय नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षिकेची 8 लाख रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार बेलतराेडी पाेलिस ठाणे हद्दीत उघडकीस आला. या प्रकरणी पाेलिसांनी तीन आराेपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. माहितीनुसार, जाेगीनगर, अजनी येथील रहिवासी शिल्पा अमरीश माेडक (37) यांची ओळख राहुल शंकर पराते (34, शंकरपूर), सुरेश गंगाधर पाटील (41, विनाेबा भावेनगर) आणि भूषण रमेश कटके (कन्हान, पारशिवनी) या तिघांशी झाली हाेती. या तिन्ही आराेपींनी संगनमत करून शिल्पा माेडक यांना बेलतराेडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील वेळाहरी येथे त्यांची यशाेदा मतिमंद मुला-मुलींची निवासशाळा आहे,
 
 
fraud
 
Financial Fraud तसेच त्यांच्या अशाच प्रकारच्या आणखी दाेन शाळा आहेत. या शाळांना शासनाकडून माेठे अनुदान मंजूर झाले आहे, असे खाेटे सांगितले. या शाळेत आराेपींनी शिल्पा यांना कायमस्वरूपी सरकारी नाेकरी व चांगला पगार मिळवून देण्याचे प्रलाेभन दाखवले. आराेपींच्या या आमिषाला बळी पडून शिल्पा माेडक यांनी 7 ऑक्टाेबर 2022 ते ेब्रुवारी 2024 दरम्यान नाेकरी मिळण्याच्या आशेने आराेपींना वेळाेवेळी 8 लाख रुपये दिले. मात्र, वर्षभराहून अधिक काळ लाेटूनही आराेपींनी त्यांना काेणतीही नाेकरी लावून दिली नाही. शिल्पा यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आराेपींकडे पैशांची मागणी केली. मात्र, आराेपींनी त्यांना रक्कम परत करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच शिल्पा माेडक यांनी बेलतराेडी पाेलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला हाेता. पाेलिसांच्या प्राथमिक चाैकशीत हा फसवणुकीचा कट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस आराेपींचा शाेध घेत आहेत.
.......