ऑनलाईन सुरक्षा मित्र बना !

पोलिस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

    दिनांक :17-May-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur City Police नागपूर शहर पोलीस आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन पोलीस भवन येथील सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमात ऑनलाईन अटक फसवणूक, एकवेळ संकेतांक (ओटीपी), ग्राहक ओळख पडताळणी (केवायसी) फसवणूक, ऑनलाईन आर्थिक गुन्हे तसेच सुरक्षित ऑनलाईन व्यवहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 
saybar
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल होते. त्यांनी उपस्थितांना “ऑनलाईन सुरक्षा मित्र म्हणून काम करा” Nagpur City Policeअसे आवाहन करत सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहण्याचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, बँक अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी डॉ. दीपक शेंडेकर, डॉ. मिलिंद वाचनेकर, मधुकर दहिकर, सवाईथूल, प्रमोद ठोंबरे आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र