देवळी,
NCC Battalion: Sneha and Purva २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत देवळीच्या एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एनसीसी सार्जंट स्नेहा मडकाम व कॅडेट पूर्वा कापटे यांची निवड तामिळनाडू राज्यातील उटी येथे १८ ते २५ मे दरम्यान आयोजित ऑल इंडिया निलगिरी ट्रेकिंग कॅम्पकरिता रवाना झालेले आहेत.
NCC Battalion: Sneha and Purva उटी येथे भारतातून निवडक छात्र सैनिक सहभागी होणार असून त्यांना निलगिरी पर्वत रांगेतील शिखरांवर चढाईचा सराव दिल्या जाणार आहे. यासोबतच त्यांना रॉक लाइंबिंग, रॅपेलिंग, जंगल भ्रमंती, जंगल खोज व रिव्हर क्रॉसिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवड झाल्याबद्दल बटालियनचे एनसीसी कमांडंट कर्नल एस. के. सिंग, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल जिसांतो, प्राचार्य डॉ. सुनीता सोनारे व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांना दिले आहे.