विकीच्या वाढदिवशी वियानची पहिली झलक

    दिनांक :17-May-2026
Total Views |
मुंबई,
Viyaans First Glimpse बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कटरिना कैफ हिने पती विकी कौशल यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या खास छायाचित्रांमुळे सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा रंगली आहे. विकी कौशलच्या अडतीसाव्या वाढदिवसानिमित्त कतरिनाने काही कौटुंबिक क्षण चाहत्यांसोबत शेअर केले असून त्यामध्ये त्यांच्या मुलगा वियानची पहिली झलकही पाहायला मिळाली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Viyaan
 
कतरिनाने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ती आणि विकी निसर्गरम्य ठिकाणी निवांत क्षण घालवत असल्याचे दिसत आहे. एका छायाचित्रात दोघे मुलगा वियानसोबत दिसत असून जरी त्याचा चेहरा स्पष्ट दाखवलेला नसला तरी चाहत्यांनी या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. Viyaans First Glimpse आणखी एका छायाचित्रात वाढदिवसाचा केक दिसत असून त्यावर “हॅपी बर्थडे पापा” असा संदेश लिहिलेला आहे. शेवटच्या छायाचित्रात कतरिना आणि विकी आनंदाने हसताना दिसत आहेत.
 
 
गेल्या काही महिन्यांपासून कतरिना चित्रपट आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून काहीशी दूर असून ती आपला जास्तीत जास्त वेळ मुलगा वियानसोबत घालवत आहे. Viyaans First Glimpse नोव्हेंबर २०२५ मध्ये या जोडप्याच्या आयुष्यात वियानचे आगमन झाले होते. मुलाच्या जन्मानंतर विकी कौशलचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने हा क्षण दोघांसाठीही अधिक खास ठरला.
 
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कतरिनाने भावनिक संदेशही लिहिला. गेल्या काही वर्षांत विकीने आपल्या आयुष्यात आधार, प्रेम आणि संयम दिल्याचे सांगत तिने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. Viyaans First Glimpse तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या असून करीना कपूर खान, अनन्या पांडे आणि इतर कलाकारांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या कतरिना आणि विकीच्या या कौटुंबिक छायाचित्रांना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.