भोंदूचा होता 'मास्टर प्लान' होणार होता...'9 दो 11'

    दिनांक :18-May-2026
Total Views |
नाशिक
Ashok Kharat  नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. मागील दोन महिन्यांपासून तो पोलीस कोठडीत आहे. एसआयटीकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. सध्या अशोक खरात पोलिसांच्या कचाट्यात सापडला असला तरी आता त्याच्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अशोक खरातने ३ महिन्यांपूर्वी एक खतरनाक प्लॅन आखला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. खरातचा हा प्लॅन यशस्वी झाला असता तर तो कुणालाच सापडला नसता असे तपासातून समोर आले आहे.
 

Ashok Kharat, Nashik bhondubaba case, fake godman scam India 
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने काळा पैसा पांढरा करून केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागण्यापूर्वीच परदेशात पोबारा करण्याचा डाव रचला होता. बँकिंग नियमांमधील त्रुटींचा आणि पळवाटांचा गैरफायदा घेत खरातने तब्बल ५२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी आता अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि अधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेसह संबंधित तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे.तपासात असेही उघड झाले आहे की, धार्मिक Ashok Kharat  आणि अध्यात्मिक उपाययोजनांच्या नावाखाली लोकांकडून मोठ्या रकमा उकळण्यात आल्या. काही प्रकरणांमध्ये गुंतवणूक, परदेश दौरे आणि वैद्यकीय उपचारांच्या नावाखालीही पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या पैशांचा वापर विविध मालमत्ता आणि वैयक्तिक खर्चांसाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू ठेवला असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.