बिग बींनी दाखवला इराणमधील हिंदू वारशा!

    दिनांक :18-May-2026
Total Views |
मुंबई,
Hindu Heritage in Iran इराणमधील १३४ वर्षे जुन्या विष्णू मंदिराचा व्हिडिओ शेअर करून अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इराणमधील बंदर अब्बास येथे असलेल्या या प्राचीन मंदिराची झलक त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत आणि इराण यांच्यातील सांस्कृतिक नात्याची आठवण करून देणारा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
Hindu Heritage in Iran
 
व्हिडिओमध्ये दिसणारे हे विष्णू मंदिर कजार काळात १८९२ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. त्या काळात बंदर अब्बास येथे व्यापारासाठी गेलेल्या भारतीय हिंदू व्यापाऱ्यांसाठी हे मंदिर उभारण्यात आले होते. Hindu Heritage in Iran मंदिरातील प्राचीन रचना, कोरीवकाम आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीची आकर्षक शिल्पकला पाहून अनेक जण भारावून गेले आहेत.
 
 
व्हिडिओमध्ये पर्शियन भाषेतील संगीतही ऐकू येत असून त्यामुळे या दृश्यांना अधिक वेगळेपण प्राप्त झाले आहे. अनेक वापरकर्त्यांनी या पोस्टला “वर्षातील सर्वात सुंदर पोस्ट” असे म्हटले असून, अशी दुर्मिळ माहिती समोर आणल्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले आहे. Hindu Heritage in Iran कामाच्या आघाडीवर अमिताभ बच्चन लवकरच कल्की २८९८ एडी च्या पुढील भागात झळकणार असल्याची चर्चा आहे. तसेच प्रभास आणि कमल हासन यांच्यासोबत ते पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.