बस ट्रॅक्टरची टक्कर! ट्रॅक्टर चालक, वाहक गंभीर जखमी

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी,
bus-tractor-collision : नागपूरवरून किनवटला जाणारी एसटी बस व नवनगर हेटीला जाणाèया ट्रॅक्टरची सातारा फाटा येथे रविवारी रात्री 10 च्या सुमारास धडक झाली. यात ट्रॅक्टर चालकाच्या पायाला गंभीर आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. बसचालकाला किरकोळ मार लागला. ट्रॅक्टरचालकाला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे.
 
 
y18May-Apaghat
 
 
 
आर्णी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दुर्योधन राठोड व सतीश चौधर हे रात्रीच घटनास्थळी पोेचले. जखमींना आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले. तर एसटी दारव्हा आगारप्रमुख निकेश उघडे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थळी पाठविण्याची व्यवस्था केली. बसचालक सुरेश वाघमारे यांनी आर्णी पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध तक्रार दिली.
या बसमध्ये 28 प्रवासी व वाहक-चालक मिळून 30 जण होते. धडक इतकी जोरदार होती की बसचा समोरचा काच व बफर तुटले. बसचे 50 हजार रुपयांच्या जवळपास नुकसान झाले.
 
 
बसचालक सुरेश वाघमारे यांना किरकोळ दुखापत झाली. वाहक सुभाष जाधव यांच्यासह बसमधील 28 प्रवासी सुखरूप आहेत. ट्रॅक्टरचालक काळू राठोड व सोबतचा मित्र रवींद्र राठोड यांना किरकोळ दुखापत झाली. अधिक तपास ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात जमादार सतीश चौधर व राम डखने करीत आहेत.