देवळी,
deoli-rural-hospital : येथील ग्रामीण रुग्णालय सध्या अस्थायी वैद्यकीय अधीक्षकांवर आहे. ऑटोबर २०२५ पासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रित आहे. या सहा महिन्याच्या कालावधीत चार प्रभारी आरोग्य अधीक्षकांनी पदभार स्वीकारले. त्यामुळे देवळी ग्रामीण रुग्णालय वार्यावर असल्यासारखे झालेले आहे.
पाच वर्षांपूर्वी देवळी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. आशिष लांडे यांची नियुती झाली होती. सहा महिन्यापूर्वी त्यांची बदली झाल्यामुळे त्यानंतर एका पाठोपाठ एक असे चार प्रभारी अधीक्षकांनी काम पाहिले आणि ग्रामीण रुग्णालयाची अवस्था वाईट झाली.
देवळी ग्रामीण रुग्णालयात २६ कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये १७ शासकीय, ९ कंत्राटी कर्मचारी, ४ वैद्यकीय अधिकारी काम पाहत आहेत. पण, त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी स्थायी अधीक्षकच नसल्यामुळे कर्मचारी, डॉटर आपल्या मर्जीनुसार रुग्णालयाचा गाडा ओढत आहेत. या रुग्णालयात कोणीही वेळेवर येत नाही आणि रात्री आपत्कालीन परिस्थिती असेल तर डॉटरला रुग्णालयात येण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो.
कधी-कधी तर किरकोळ रुग्णाला रात्र पाळीवर असलेले डॉटर, परिचारिका यांना फोनवरूनच रुग्णाला कोणते औषध द्यावे हे सांगतात, अशी अवस्था सध्या या ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. देवळी ग्रामीण रुग्णालयात स्थायी वैद्यकीय अधिकार्याची नियुती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.