Kairi Bhel उन्हाळ्यात कैरीपासून तयार होणारे पदार्थ खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरतात. त्यातच आंबट-गोड चवीची आणि झटपट तयार होणारी कैरी भेळ हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. कमी वेळात तयार होणारी ही चटपटीत भेळ संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
साहित्य
दोन वाट्या कुरमुरे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी किसलेली कैरी, अर्धी वाटी फरसाण, बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घ्यावे.
कृती
सुरुवातीला एका मोठ्या Kairi Bhel भांड्यात कुरमुरे घ्यावेत. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेली कैरी, फरसाण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यावे.सर्व्ह करण्यापूर्वी वरून ताजी कोथिंबीर घालावी. त्यामुळे भेळीची चव आणखी खुलते. आवडीनुसार भाजलेले शेंगदाणे किंवा हिरवी चटणी घालूनही ही भेळ अधिक चविष्ट बनवता येते.आंबट, तिखट आणि कुरकुरीत चवीचा संगम असलेली ही कैरी भेळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल.