पुणे
sexual assault case शहरातील कोरेगाव पार्क परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. हॉटेलमधील पार्टीनंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने एका महिलेला कारमध्ये बसवून तिच्यावर धावत्या वाहनात लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,sexual assault case पीडित महिला कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आली होती. याच ठिकाणी तिची ओळख एका पुरुषाशी झाली. पार्टी संपल्यानंतर रात्री उशिरा संबंधित व्यक्तीने महिलेला घरी सुरक्षित सोडण्याचे आश्वासन देत विश्वास संपादन केला आणि तिला आपल्या कारमध्ये बसवले.त्यानंतर मुंढवा ते कोरेगाव पार्क मार्गावर कार जात असताना आरोपीने वाहनातच गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि धावत्या कारमध्ये महिलेशी गैरवर्तन करून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित महिला तातडीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात पोहोचली आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्हा नोंदवला असून आरोपीविरोधात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.या घटनेमुळे कोरेगाव पार्क आणि आसपासच्या परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.