घरच्या घरी बनवा 'राईस वॉटर टोनर'; त्वचेवर येईल नैसर्गिक चमक!

    दिनांक :18-May-2026
Total Views |
Make Rice Water Toner at Home आजकाल नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामध्ये तांदळाचे पाणी (Rice Water) हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येणारे हे फेस वॉटर त्वचेला चमकदार, मुलायम आणि तजेलदार बनविण्यास मदत करते.
 
 Rice Water Toner
 
हे फेस राईस वॉटर तयार करण्यासाठी ३ ते ४ चमचे तांदूळ आणि १ कप पिण्याचे पाणी लागते. सर्वप्रथम तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुऊन घ्यावा, जेणेकरून त्यातील धूळ आणि अशुद्धता निघून जाईल. त्यानंतर एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात १ कप पाणी टाकावे. हे मिश्रण झाकून किमान ३० ते ४० मिनिटे किंवा इच्छेनुसार रात्रभर तसेच ठेवावे.
 
नंतर तांदूळ गाळून घेतल्यानंतर उरलेले पाणी एका स्वच्छ बाटलीत किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे. हे पाणी नैसर्गिक टोनर म्हणून वापरता येते.
 
वापरण्यासाठी कापसाच्या मदतीने हे पाणी चेहऱ्यावर हलक्या हाताने लावावे किंवा स्प्रे करून सौम्य मसाज करावा. यामुळे त्वचेला ताजेपणा आणि नैसर्गिक चमक मिळते.
टीप: तयार केलेले हे तांदळाचे पाणी फ्रिजमध्ये ठेवून सुमारे ७ दिवसांपर्यंत वापरता येते.