वेतनवाढीवरुन मुंबई विमानतळावर गोंधळ

    दिनांक :18-May-2026
Total Views |
मुंबई,
Mumbai airport protest छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सरकारी मालकीच्या ग्राउंड हँडलिंग कंपनी, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयएएसएल) कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनामुळे विमानतळावर गोंधळ उडाला. या आंदोलनाचा थेट परिणाम विमानांवरही झाला. आंदोलनामुळे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक विमानांना विलंब झाला.
 

Mumbai airport protest 
एआयएएसएल कर्मचारी विमानतळांवर प्रवासी चेक-इन, सामान चढवणे, विमानांची स्वच्छता आणि इतर आवश्यक सेवा हाताळते. कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या आंदोलनामुळे या सेवा विस्कळीत झाल्या आणि विमान वाहतुकीवर परिणाम झाला. एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले की, हे आंदोलन एका त्रयस्थ एजन्सीच्या कर्मचाèयांनी केले होते, परंतु त्यांची टीम परिस्थिती हाताळण्यासाठी आणि प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.
 
 
प्रवाशांना बसला फटका
 
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक विमानांना विलंब झाला. एअर इंडियाने बाधित झालेल्या विमानांची एकूण संख्या जाहीर केली नसली तरी, विमानतळावरील प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला. एआयएएसएल व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नंतर सामान्य झाली.
 
 
20,000 कर्मचारी हाताळतात 650 उड्डाणे
कंपनीचे सीईओ रामबाबू यांनी सांगितले की, कर्मचाèयांनी त्यांच्या मागण्या मांडणारे एक पत्र सादर केले असून, कंपनी आता नियमांनुसार त्याचा आढावा घेईल. एआयएएसएल देशभरातील 84 विमानतळांवरून दररोज अंदाजे 650 उड्डाणे हाताळते. एआयएएसएल देशभरातील 84 विमानतळांवरून फ्लायदुबई, सौदिया, ओमान एअर आणि सलामएअर यांसारख्या परदेशी विमान कंपन्यांसह अंदाजे 80 विमान कंपन्यांना सेवा देते. कंपनीत अंदाजे 20,000 कर्मचारी असून ती दररोज अंदाजे 650 उड्डाणे हाताळते.