मुंबई
Tilak Varma अलीकडेच क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि अभिनेत्री श्रीलीला यांच्याबाबत सामाजिक माध्यमांवर सुरू असलेल्या नात्याच्या अफवा आता पूर्णपणे फेटाळण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर युवा क्रिकेटपटू आणि अभिनेत्री एकमेकांना भेटत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र, या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने स्पष्ट केले आहे की या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
या सर्व चर्चांवर आता सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे म्हटले गेले आहे. “तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्याबद्दल होत असलेल्या चर्चा पूर्णपणे तथ्यहीन आणि खोट्या आहेत. हे दोघे कधीच एकमेकांना भेटले नाहीत किंवा एकमेकांशी बोलले नाहीत. या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही आणि अशा खोट्या कथा तथ्यांच्या पडताळणीशिवाय पसरवू नका”, असे सूत्रांनी म्हंटल आहे.दुसरीकडे सोशल मीडियावर असाही दावा केला जातोय की श्रीलीला एका क्रिकेट मॅचला उपस्थित होती आणि त्यावेळी तिच्या Tilak Varma टीममधील एका व्यक्तीने ‘तिलक’ नावाची जर्सी घातली होती. यामुळे तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्या नात्याबद्दल चर्चांना उधाण आलं. आयपीएल 2026 मधील आपल्या प्रभावी कामगिरीसोबतच तिलक वर्मा सोशल मीडियावर तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय आहे.