तभा वृत्तसेवा
कळंब,
sheetal-pandey : मिळकत पत्रिकेवर नाव चढवण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणाèया भूमी अभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी शितल विजय पांडे हिला लाचलुचपत विभागाने मंगळवार, 19 मे रोजी रंगेहात अटक केली.
सतत वादात असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शितल पांडे (वय 35) हिला कार्यालयातच संध्याकाळी 5 वाजता यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा करून रंगेहात पकडल्याने या वर्तुळात एकच खळबळ उडाली.
शितल पांडे हिने कोठा येथील तक्रारदारांना आपल्या वारसाचे नाव मिळकत पत्रिकेवर चढविण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे त्यांनी यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली.
त्यानुसार यवतमाळ येथील पथकाने सापळा रचून शितल पांडे हिला रोख रक्कम घेताना रंगेहात पकडले. याबाबत कळंब पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील कारवाई करत आहे.