‘दृश्यम ३’चा मोठा धमाका; प्रदर्शनापूर्वीच डिजिटल करार निश्चित

    दिनांक :19-May-2026
Total Views |
मुंबई,
Drishyam 3 मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता मोहनलाल यांचा बहुचर्चित रहस्यपट दृश्यम् ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या डिजिटल प्रदर्शनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, मोहनलाल यांच्या वाढदिवसानिमित्त २१ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.
 
Drishyam 3
 
‘दृश्यम’ मालिकेतील आधीचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पसंत केले होते. त्यामुळे तिसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. Drishyam 3 चित्रपटगृहातील प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या डिजिटल हक्कांचा करार पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर साधारण महिनाभरात तो ऑनलाइन माध्यमावर प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील भागांप्रमाणेच ‘दृश्यम ३’ देखील ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, चित्रपटगृहातील प्रदर्शनानंतर सुमारे ३० ते ३५ दिवसांनी हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
 
नुकत्याच समोर आलेल्या झलकांमुळे या भागातील कथानक अधिक गूढ आणि थरारक असणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आतापर्यंत जॉर्जकुट्टी आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष पोलिसांसोबत दाखवण्यात आला होता, मात्र यावेळी एका अज्ञात व्यक्तीमुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. Drishyam 3 ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि तिचा हेतू काय आहे, याभोवती कथानक फिरणार असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटात मीना, एस्थर अनिल आणि मीना, एस्थर अनिल हे कलाकारही पुन्हा आपल्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे ‘दृश्यम ३’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.