‘हीरो नंबर वन’च्या बदललेल्या रूपाने चाहत्यांना धक्का

    दिनांक :19-May-2026
Total Views |
मुंबई,
Hero Number One हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या गोविंदाने नुकतीच मुंबईतील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात चाहत्यांनी त्याचे उत्साहात स्वागत केले, मात्र यावेळी त्याच्या हास्यात दिसलेला तुटलेला दात सोशल माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रमादरम्यान गोविंदा नेहमीप्रमाणे चाहत्यांना अभिवादन करत हसतमुखाने संवाद साधताना दिसला. मात्र छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यात त्याचा तुटलेला दात स्पष्ट दिसल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी वाढत्या वयामुळे अशा गोष्टी स्वाभाविक असल्याचे म्हटले, तर काहींनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली.
 
Hero Number One
 
दरम्यान, अनेक चाहत्यांनी गोविंदाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत त्याच्यावरील प्रेम व्यक्त केले. वय काहीही असले तरी गोविंदाची शैली, विनोदबुद्धी आणि चाहत्यांशी असलेले नाते अजूनही कायम असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. काहींनी लोकांना त्याच्या तुटलेल्या दाताऐवजी त्याच्या कायम आनंदी आणि प्रसन्न स्वभावाकडे पाहण्याचा सल्लाही दिला. सध्या गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. Hero Number One पत्नी सुनीता अहुजा यांच्यासोबतच्या नात्याबाबत अनेकदा बातम्या समोर येत असतात. अशातच गोविंदाने अलीकडेच मुलगी टीना अहुजा हिला पाठिंबा देण्यासाठी एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. टीना लवकरच शिल्पा शेट्टी यांच्या नव्या पाककला कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर झळकणार असल्याची चर्चा आहे.