अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
molestation-of-a-minor-girl : अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी पांढरकवडा येथील विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनीष कोठारी यांनी आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सोमवार, 18 मे रोजी सुनावली.
 
 
K
 
 
 
आरोपी दीपक देवचंद बोरकर (वय 25, अर्ली, ता. केळापूर, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाण्यात भारतीय दंडसंहिता, बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस भारतीय दंडसंहिता अंतर्गत 2 वर्षे कारावास व 1 हजार रुपये दंड, तसेच 1 वर्ष कारावास व 1 हजार रुपये दंड आणि पोक्सो अंतर्गत 3 वर्षे कारावास व 3 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या असल्याने आरोपीस एकूण 3 वर्षे शिक्षा झाली आहे.
 
 
घटनेतील माहितीनुसार, 31 डिसेंबर 2019 ला पीडित नदीवर कपडे धुण्यास गेली असता आरोपीने तिचा पाठलाग करून हात पकडून विनयभंग केला होता. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचल्याने आरोपी पसार झाला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
 
 
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक विनोद झळके यांनी केला. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. रमेश मोरे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. या प्रकरणात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले.