अभय इंगळे,
दिग्रस,
mp-funds : निधीचा वापर कुठे व कसा करायचा याचे भान नसलेल्या जिल्हा परिषद उपविभाग आर्णीच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिग्रसच्या प्रभाग 3 मध्ये गरज नसताना 5 लाख रुपयांचे टिनशेड बांधून खासदार संजय देशमुख यांच्या निधीची अक्षरशः वाट लावली आहे.
कार्यकारी अभियंता सुनील राठोड यांनी खासदार संजय देशमुख यांच्या निधीतून 5 लाख रुपये खर्च करून नको असलेल्या जागी व तशी फारशी गरज नसताना निवारा बांधला आणि मोकळे झाले. 4 टिनांच्या निवारा बांधकामाला 5 लाख रुपये लागतात का, हा तर वेगळाच विषय आहे.
मात्र जो निवारा उभा झाला त्याचा केवळ दुरुपयोगच होईल हे स्वतः बघितल्यावर खासदार संजय देशमुखसुद्धा संतापच व्यक्त करतील. कारण त्यांच्या अनुपस्थितीत परवाच टिनशेडचे लोकार्पणही आटोपून घेण्यात आले आहे.
येथील जुना दारव्हा रोड नागरिकांसाठी ‘जॉगिंग ट्रॅक’ आहे. या मार्गावर रहदारी नसून आजूबाजूला शेत शिवार, मोठमोठी कडुनिंबाची झाडे, पुढे अरुणावती धरण असा हा 4 किमी मार्ग सकाळी व संध्याकाळी पायी फिरणाèयांसाठी फारच सोयीचा आहे.
यापूर्वीच 10 लाख रुपये खर्च करून शिवापूरजवळ ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी निवारा बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्याचीही गरज नव्हतीच. मात्र थकलेल्यांना बसता यावे हा त्या मागचा उद्देश होता. मात्र त्याही निवाèयाचा उपयोग करताना कोणी दिसत नाही. नको तेच त्याचा जास्त उपयोग घेत आहेत.
असे असताना त्यालाच लागून दुसरा निवारा बांधणे जबाबदार कार्यकारी अभियंता सुनील राठोड यांना कसे सुुचले, हेही एक कोडेच आहे. याच निवाèयापुढे दारूचे दुकान असून ते 24 तास सुरू असते. येथे येणारे दारूडे नवीन बांधकाम झालेल्या निवाèयाचा ‘चांगलाच’ उपभोग घेतील हे मात्र खरे. म्हणूनच खासदार निधीची कशी वाट लागली, असे फिरायला येणारे दररोज बोलताना दिसत आहेत.